इंदापूर : प्रतिनिधी -दि.१०जुलै,
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला असून इंदापूर शहरातील प्रसिध्द व्यापाऱ्याचा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये आज(दि.१० जुलै) रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
बुधवार (दि.१जुलै) रोजी इंदापूर शहरातील या ५७ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.आज (दि.१०)जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आजपर्यंत इंदापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी भिगवण येथील ६३ वर्षीय महिला, दुसरा बळी इंदापूर शहरातील ७८ वर्षीय पुरुष आणि आता शहरातीलच ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
आजवर इंदापूर तालुक्यात एकूण कोरोनाचे ४६ रुग्ण झाले होते. त्यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सध्या २२ रुग्णांवर उपचार चालू आहेत.
कोरोनाचा तिसरा बळी .....इंदापूर शहरातील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू... पुण्यामध्ये सुरु होते उपचार