औंध(वार्ताहर):-
वरुड ता.खटाव येथे गुरुवारी पुणे रिटर्न
25वर्षीय युवक कोरोना पाँझिटीव्ह सापडल्याने सात दिवसांसाठी संपूर्ण वरुड गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान वरूड गाव परिसरातील कुमठे,लोणी,औंध या गावांकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी पुण्याहून वरुड येथे आलेल्या 25वर्षीय युवकाला क्वारंटाईन करण्यात आले होते मात्र दोन तासातच युवकाला त्रास जाणवू लागल्याने औंंध येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला मायणी येथे हलविण्यात आले. त्याठिकाणी त्याचा स्वँब घेतल्यानंतर गुरुवारी तो युवक कोरोना पाँझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी सकाळी गटविकास अधिकारी नंदकुमार काळे,नायब तहसीलदार शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख
पोलीस उपनिरीक्षक सोमदे, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, तलाठी काटकर, सरपंच वैशाली माने, पोलीस पाटील आण्णा जाधव ,लालासाहेब माने यांनी गावाची पाहणी करून संबंधित रुग्ण गावातील कोणाच्याही संपर्कात नआल्याने दिलासा व्यक्त करुन खबरदारीसाठी
सात दिवसांसाठी वरुड गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सात दिवस वरुड गाव लाँकडाऊन राहणार आहे तर युवकास क्वारंटाईन केलेला तीनशे मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून चौदा दिवस लाँकडाऊन केला आहे.