इंदापूर येथे १० जणांना कोरोना ची लागण; आरोग्य सेविकेला ही बाधा



इंदापूर : प्रतिनीधी -

●एकाच दिवशी इंदापूर शहर व तालुक्यातील  १० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

● इंदापूर शहरातील महसूल खात्यातील एका मंडल अधिकाऱ्यासह ५ जणांचा  समावेश.

       इंदापूर तालुक्यात सोमवार दि. १३ रोजी  तालुक्यातील १० व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.  ४२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
        इंदापूर तालुक्यामध्ये एकाच दिवसामध्ये दहा रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा एकदा इंदापूर शहरासह तालुक्याचा ग्रामीण भाग हादरला असून आता नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.
   इंदापूर तालुक्यामध्येआढळलेल्या रुग्णामध्ये लासुर्णे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्राचा रुग्णवाहिकेचा चालक, तर १० जुलै रोजी भिगवण येथील एका ४० वर्षीय मृत्यू पश्चात या महिलेचा अहवाल हा पाॅझिटीव्ह आला होता.
या महिलेच्या संपर्कातील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून अकोले येथील एका महिलेचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय इंदापूर शहरातील महसूल खात्यातील एका मंडल अधिकाऱ्यासह ५ जणांची  कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे
     दरम्यानच्या कालावधीमध्ये दि.११जुलै रोजी लासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रातील एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर तिच्या कुटूंबातील ५ व्यक्तीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. यावेळी लासुर्णे येथील सतरा व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी रुग्णवाहिकेच्या चालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
     इंदापूरातील सध्या २० रुग्णांवर उपचार करण्यात येत असून बारामती मधील रुई ग्रामीण रुग्णालयात ४ तर इंदापूर येथील कोवीड केअरमध्ये १६ रुग्ण उपचार घेत आहेत.
 इंदापूर तालुक्यामध्ये एकाच दिवसांमध्ये दहा रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा एकदा इंदापूर शहरासह तालुक्याचा ग्रामीण भाग हादरला असून आता नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची वेळ आली आहे.