पिंपोडे बु ॥ येथील दोघांना कोरोना ची लागण, ७ दिवस लाँकडाऊनचा प्रशासनाचा निर्णय.



पिंपोडे बु ॥ (प्रतिनिधी ) -

उत्तर कोरेगांव मधील पिंपोडे बु येथील व्यापारी बाजार पेठेच्या ठिकाणी राम वार्डा मधील स्थानिक दोंघांना कोरोनो पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट रात्री उशीरा आले मुळे सकाळी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते त्यामुळे प्रशासनाने अनेक ठिकाणी लॉकडाऊन करून  पुढील अनर्थ होऊ नये यासाठी खबरदारीची बाब म्हणून उपाययोजना केल्या आहेत सदर कोरोनो चा फैलाव होऊ नये म्हणून,नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन  कोरेगांव च्या तहसिलदार रॊहिणी शिंदे यांनी केले आहे .
      याबाबत पिंपोडे बु ॥ ता कोरेगांव येथे यापूर्वी तिन रूग्ण कोरोनो पॉझिटिव्ह सापडले होते मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते मात्र काल रात्री उशीरा दोन स्थानिक रूग्नांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेने याठिकाणी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे,त्यामुळे हे रुग्ण कोणा कोणाच्या संपकार्त आले याची चौकशी संबधीत खात्याकडुन सुरु असुन,हे रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्यात भिंतीचे वातावरण पसरले असुन संबधीत प्रशासन सखोल चौकशी करत आहे
      पिंपोडे बु ॥ येथील राम वार्डासह अनेक ठिकानी ग्रामपंचायत कोरोनो ग्रामदक्षता समिती,व महसुल खाते यांच्या सह मंडलाधिकारी तलाठी,ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य,यांनी शासन नियमा प्रमाणे नागरिकांच्या सुरक्षे च्या दृष्टीकोनातून पिंपोडे बु ॥ लॉकडाऊन केले असुन नागरिकांनी स्वःताची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे,सुरक्षित अंतर ठेवणे,व कामा शिवाय  घराबाहेर पडु नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.कोरोना या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातील दवाखाने व मेडिकल व सेवा वगळून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 13 जुलै ते 20 जुलै सात दिवस संपुर्ण परिसरात उस्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय गावच्या वतीने घेण्यात आला