औंध(वार्ताहर):-
औंंध पोलीसांनी मागील काही दिवसात दुचाकी व चारचाकी वाहनांंवर धडक कारवाई करत
सुमारे 170 वाहनांवर केेेसेस केल्या यामाध्यमातून सुमारे 53हजाराचा दंड पोलीसांनी जप्त केला.
यामध्ये 150दुचाकी व वीस चारचाकी वाहनांवर पोलीसांनी धडक कारवाई केली.
सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे यांच्या पथकाने औंध,पुसेसावळी , चौकीचा आंबा व अन्य ठिकाणी नाकाबंदी करत विनामास्क, विना लायसेन्स, कागदपत्रांअभावी बेकायदेशीरपणे वाहनधारकांवर कारवाई करत ही दंड वसुली केली आहे.
यापुढील काळातही औंध पोलीस अधिक कडक कारवाई करणार असल्याची माहिती भापकर यांनी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने वाहनधारकांनी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे औंध पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे चाळीस गावात कारवाई ची मोहीम अधिक कडक केली जाणार आहे.
फोटो.. औंध येथे वाहनधारकांची तपासणी करताना पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुंडलिक कटरे