![]() |
| ना. जयंत पाटील यांना निवेदन देताना सुरज पाटील व इतर. |
आटपाडी -वार्ताहर:
आटपाडी ता. शेटफळे येथील मंजूर असलेल्या कोल्हापूर टाइप बंधाऱ्याचे काम 2007 साली सुरू झालेले अद्यापही काम बंद आहे.
याबाबत चौकशी करुन काम सुरु त्रकरण्याचे
आदेश राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहेत .
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत हे काम सुरू होते.मात्र त्यानंतर हे काम बंद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेसचे नेते सुरज पाटील व शेटफळे येथील युवक काँग्रेस नेते किशोर गायकवाड यांनी शेटफळे ग्रामस्थांच्या समवेत नामदार जयंत पाटील यांना याबाबतचे निवेदन दिलेले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे 2006 साली शेटफळे येथील ओढ्यावर दोन कोल्हापूर बंधारे मंजूर करण्यात आले होते. या कामाचे टेंडर ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेलं होतं.
सन 2009 पर्यंत हे काम सुरू होते मात्र या कामावर सुमारे 80 लाख रुपये खर्च होऊन देखील हे काम अर्ध्यावरच बंद करण्यात आलेले आहे .
याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत.
शेटफळे ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाठपुरावा केला .मात्र शेतकऱ्यांना याबाबत कोणतेही उत्तर मिळाले नाही.
अखेर सूरज पाटील यांना भेटून शेटपळे ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर त्यांनी ना. जयंत पाटील यांना भेटून हे काम त्वरित सुरु करण्यासाठी निवेदन दिले.
असता ना. जयंत पाटील यांनी याबाबत चौकशी करून काम सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते रावसाहेब पाटील,
अरुण गायकवाड ,विशाल गायकवाड ,यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
