इंदापूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासाहेब सोनवणे यांची निवड.


.
इंदापूर : प्रतिनिधी (दि.१४ जुलै)
         इंदापूर नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली. सोनवणे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल इंदापूर शहरचे कामकाज पाहतात. पक्ष संघटन वाढीसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली.

       दि. ३जुलै २०२० च्या शासन आदेशानुसार बुधवार दि.१४ जुलै रोजी नगराध्यक्षाअंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. मावळते स्विकृत नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी आपला पदाचा मागील चार महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोनवणे यांना संधी देण्यात आली. सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने पीठासन अधिकारी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सोनवणे यांच्या निवडीस मान्यता दिली.
    नुतन  नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी पदभार स्विकारताच शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवडीनंतर नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल, सर्व नगरसेवकांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले.
     दरम्यान इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते नुतन स्विकृत नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांना सन्मान करण्यात आला.
       यावेळी श्री. सोनवणे म्हणाले की,  तालुक्याचे आमदार,  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यानेतृत्वाखाली शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
      यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, वसंतराव माळुंजकर, प्रा.अशोक मखरे, शहराध्यक्ष अनिल राऊत,राजेश शिंदे,महादेव लोखंडे,विकास खिलारे,दत्तू शिंदे,ज्ञानेश्वर सोनवणे,वसिम बागवान उपस्थित होते.