आटपाडी-वार्ताहर:
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व उध्योग धंदे रोजगार बंद असताना महावितरण विभागाकडून विज बिले वाढवून आले आहेत लाँकडाऊनच्या काळातील 3 महिन्याची घरगुती विज बिले माफ करण्यात यावी या मागणी साठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर पुकारलेल्या विज बिलांची होळी या आंदोलनास प्रतीसाद म्हणून आटपाडी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आटपाडी तहसिल आँफीस समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड ,
बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा युवक उपाध्यक्ष अमित गिड्डे,
राष्ट्रवादीचे माजी तालुका युवा अध्यक्ष अमित ऐवळे , अजय लोखंडे , हणमंत केंगार , विलास रूपनर , पुनित काळसेन , सोमनाथ पवार व आदि कार्यकर्ते उपस्थित होते..