वरकुटे - मलवडी मध्ये आणखी तीन करोनाबाधित



वरकुटे - मलवडी / वार्ताहर.



       वरकुटे - मलवडी ता. माण येथील आणखी तीन जण रविवारी रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये करोनाबाधित आढळून आले आहेत. गावातील बाधितांची संख्या चार वर पोहचली असून बाधितांच्या निकट सहवासातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
               वरकुटे - मलवडी गावातीलच एक ३६ वर्षीय शेतकरी सुरूवातीस बाधित झाला होता. त्यानंतर त्या शेतकर्यांचे निकटवर्तीय १४ जणांना विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सगळ्यांचे स्वँब घेण्यात आला होता. त्यापैकी तीन जणांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह आले आहेत. ६२ वर्षीय पुरुष , एक ५५ वर्षीय महिला व एक पाच वर्षाचा मूलगा बाधित आढळला असून त्या सर्वांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या बाधिताच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी अति हाय रिस्क मधील व्यक्तींना म्हसवड येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
       संबंधित पहिला करोनाबाधित आढलेल्या रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे स्वँब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह आले आहेत.  वरकुटे - मलवडी व परिसरात पहिल्यांदाच करोनोचा रुग्ण सापडल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे , गावकामगार तलाठी गणेश म्हेत्रे , सरपंच बाळकृष्ण जगताप , ग्रामविकास अधिकारी शेख , पोलीस पाटील धनंजय सोनवणे , आशा सेविका , अंगणवाडी सेविका या सर्वांनी बाधित व्यक्तीच्या कुटुंंबाची व शेजारच्या लोकांची भेट घेवुन खबरदारी घेण्याची सूचना करून करोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत.