शिखर शिंगणापूर येथे भाविकांची झुंबड; पोलिसांनी प्रवेश बंद करावा.



शिंगणापुर-वार्ताहर-
शिखर शिंगणापूर आज सोमवती  अमावस्या आहे व श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आज सकाळी शिंगणापूर गावांमध्ये दीडशे ते दोनशे लोक चार चाकी दोन चाकी गाडी घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. भाविक विविध विभागातून आपली वाहने घेऊन  आले होते.   
शिंगणापुर गावाजवळच्या  परिसरात कोरोनाचा  प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
       सध्याची परिस्थिती भयानक  आहे.  शिखर शिंगणापूर गावातील उपजीविका करणे मोठे कठीण झाले आहे.संपूर्ण जीवनमान कोलमडले आहे.कोरोनापासून बचाव होण्यासाठी कोरोना समिती व ग्रामपंचायत शिंगणापूर यांच्याकडून मंदिरपरिसरात जाण्यास बंदी घालण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी. कारण श्रावण महिना चालू झाल्यामुळे बाहेरून भक्त येणार आहेत .गावमध्ये  सीमा बंद केल्या तर शिंगणापूर मध्ये प्रवेश करणार नाहीत .जेणेकरून ही काळजी घेतली तरच  शिंगणापुर गाव कोरोनामुक्त ठेवणे सोपे जाईल .शिंगणापुर गावांमध्ये येणाऱ्या मार्गावर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्मचारी नेमून बाहेरील वाहनाची रहदारी थांबवावी अशी मागणी शिंगणापुर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
●तालुका प्रशासनाने तीर्थक्षेञ शिखर शिंगणापुर या ठिकाणी श्रावण महिन्यात बाहेरून येणाऱ्या वाहनावर योग्य ती उपाययोजना करण्याबाबत संबंधित प्रशासनास आदेश देऊन शिंगणापुर गावामध्ये वाहनाची सुरू असलेली वर्दळ थांबवावी .
●शंभू महादेव देवस्थान शासनाच्या नियमाचे पालन काटेकोरपणे पाळत आहे. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाना पूर्णपणे निर्बंध करण्यात घालण्यात  आले आहेत.