ऐतिहासिक तळ्याच्या भिंतींची गायत्रीदेवी यांनी केली पाहणी.




औंध -वार्ताहर:-

कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
काम लवकर पूर्ण करण्याची सुचना दिल्या.

  औंध येथील ऐतिहासिक पझ्माळे तळ्याच्या भिंतीच्या कामाची सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
 गेल्या वर्षी झालेल्या धुव्वाधार पावसात येथील ऐतिहासिक पझ्माळे तळ्याची भिंत कोसळली होती. त्यामुळे रस्त्याशेजारील घरांना धोका निर्माण झाला होता. याबाबत गायत्रीदेवी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन ऐतिहासिक तळ्याचे महत्त्व विषद करून तळ्याच्या संरक्षण भिंतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. धार्मिक विधीच्या द्दष्टीने तळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सिंघल यांनी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यंदा या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरुवात झाली होती. मात्र लाँकडाऊन मुळे हे काम अडकले होते मात्र जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नियमात दिलेल्या शिथीलतेमुळे हे काम गतीने सुरू आहे.
 आज गायत्रीदेवी यांनी या कामाची पाहणी केली. तसेच शक्य होईल तेवढे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सुचना दिल्या.
 यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता एस ए. देसाई, शाखाअभियंता एस बी पवार, हणमंतराव शिंदे राजेंद्र माने, आब्बास आत्तार, गणेश देशमुख, नवनाथ वलेकर, सचिन शिंदे, प्रदीप कणसे, प्रा. संजय निकम,  कार्यकर्ते उपस्थित होते.


औंध येथील पदमाळे तळयाची पाहणी करताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंत शिंदे,शरद राजभोज, शरद दराडे, ए.ए.देसाई ,राजेंद्र माने व अन्य