सायली राणे ला बारावी परीक्षेत ९२% गुण




मेढा(धनंजय गोरे):-



महाबळेश्वर आगारात एसटी महामंडळ च्या विश्रामगृहात आतिथ्य परिचर म्हणून काम करत असलेल्या शंकर राणे यांची मुलगी सायली शंकर राणे हिने १२ वीच्या परीक्षेत ९२%गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले असून  ती पाचगणी येथील सिल्वरडेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत होती. कॉलेज मध्ये तिने मध्ये  प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोणतीही शिकवणी न लावता, कोचिंग क्लासचा आधार न घेता सायली ने हे यश संपादन केले आहे. सायलीचे वडील हे महाबळेश्वर आगारात गेल्या अनेक वर्षांपासून आतिथ्य परिचर म्हणून काम करत आहेत. एसटी कामगारांच्या मुलीने मिळवलेले हे यश प्रशंसनीय असून तिच्या यशाबद्दल तिच्या महाविद्यालयासह  महाबळेश्वर आगराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.