सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा.



मुंबई-
विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.नामदार जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विधानभवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस मा.आमदार मकरंद पाटील, मा.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसिंचन विभागाची जागा ही देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार या जागेची पाहणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, प्रदेशाध्यक्ष मा.नामदार जयंत पाटील,  महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली होती त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.नामदार जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः लक्ष घालून लवकर निर्णय व्हावा आशा सूचना केल्या होत्या.त्यानुसार तातडीने निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे..