नासिक:वृतसेवा-
अभिनेता अक्षय कुमार यांचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
नुकताच अक्षयकुमार हा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गेलेला होता .
तेथे त्यांनी एक दिवस मुक्काम पण केला याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला असून याबाबत अक्षय कुमार यांच्यावर कारवाई करण्यासाठी, असे आदेश पण छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
याबाबत चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या राज्यात कोणाचा कोरोना चा कहर आहे.
जिल्हा बंदी असल्यामुळे परराज्यातून आणि परजिल्ह्यातील येण्यासाठी सर्वांना बंदी आहे .
असे असताना अक्षय कुमार यास हेलिकॉप्टरने येण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती.
याबाबत त्याचे फोटो पण व्हायरल झालेले आहेत .
यानंतर हा वाद निर्माण झालेला असून अक्षय कुमार यास नाशिकला हेलिकॉप्टरने येण्यासाठी परवानगी कोणी आणि कशी दिली .
याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे .
संबंधित अधिकारी याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक मध्ये एक दिवस त्यांनी मुक्काम केला होता या मुक्कामाचे गुढ अजून कायम आहे.