म्हसवड...
खडकी हद्दीतील 74 वर्षिय
कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला असून म्हसवड येथील स्मशानभूमी मागील भागात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
म्हसवड नगरपालिकेला याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यानंतर म्हसवड नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
पाटोळे खडकी येथील या महिलेला 28 रोजी लागण झाली होती. अखेर तिचा रक्तदाब व इतर त्रासाने मृत्यू झाला.
तिच्या कुठुंबातील
५जण संक्रमीत असून त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरु आहेत.
म्हसवड पासून खडकी पाच किलोमीटर अंतरावर असल्याने म्हसवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आरोग्य कर्मचारी सागर सरतापे, मुख्याधिकारी केरूरे व सपोनि गणेश वाघमोडे हे उपस्थित होते.