हर्षवर्धन पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीवर निवड


इंदापूर : प्रतिनिधी (दि.४जुलै)
   
     भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (दि.3 जून) मुंबईत नूतन कार्यकारिणीची घोषणा केली.  यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची  महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
   
         महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भाजप कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली.  हर्षवर्धन पाटील यांचे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठे योगदान असून त्यांचे कार्य,अनुभवाच्या माध्यमातून भाजप पक्ष मजबूत करून कार्यविस्तार करणार आहे.
   
      हर्षवर्धन पाटील यांची राज्य कार्यकारणी मध्ये निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.