सहायक विक्रीकर अधिकारी पदी सागर बेलोशे ची निवड




मेढा(धनंजय गोरे):-

केळघर ता. जावली येथील सुपुत्र सागर तानाजी बेलोशे यांनी  राज्य सेवा पूर्व परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून त्यांची निवड सहायक विक्रीकर अधिकारी या पदावर निवड झाली आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील सागर बेलोशे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पहिल्याच प्रयत्नात सागरने राज्य सेवा परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला आहे.
      सागर हा शेतकरी कुटुंबातील असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून कोणताही क्लास, शिकवणी न लावता सागरने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. सध्या सागर हा रायगड जिल्हा परिषदेत पोलादपूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. अध्यापनाचे काम करत असताना कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यासातून सागरने हे यश मिळवले आहे.
त्याची निवड सहायक विक्रीकर अधिकारी म्हणून झाली आहे. आपल्या परिस्थिती चे रडगाणे न गाता केवळ जिद्द, चिकाटी व परिश्रम या त्रिसूत्री तुन आपण हे यश मिळवले असून भविष्यात जावळी तालुक्यातील राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्याचा मनोदय असल्याचे सागरने सांगितले.पहिल्याच प्रयत्नात सागरने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.