इंदापूर : प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे यांनी अलंकार ग्रुप ऑफ इंदापूरचे संस्थापक व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत हाजी तय्यबभाई इमामभाई बागवान व श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत श्रीकांत स्वामी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नगरसेवक पोपट शिंदे, स्विकृत नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, अपंग हक्क परिषदेचे सागर मिसाळ हे त्यांच्या समवेत होते. हाजी तय्यबभाई इमामभाई बागवान पंधरा वर्षे इंदापूरचे नगरसेवक होते. प्रगतशील शेतकरी, उद्योजक म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर श्रीकांत स्वामी हे श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते होते.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.