औंधसह परिसरातील वीस गावात कडक लाँकडाऊन; रस्ते झाले निर्मनुष्य.. सर्वत्र शुकशुकाट



औंध(वार्ताहर):-

सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारपासून पुढील दहा दिवस कडक लाँकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर औंंधसह परिसरातील वीस गावांमध्ये सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडक लाँकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.

शुक्रवारपासून औंंधसह परिसरातील जायगाव, कोकराळे, त्रिमली,वडी,कळंबी, करांडेवाडी,गणेशवाडी, खरशिंगे, वरुड, पळशी,  भूषणगड,वांझोळी, येळीव, सि.कुरोली, भोसरे, चौकीचा आंबा, लोणी, कुमठे ,खबालवाडी, लांडेवाडी व अन्य गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी घरात थांबणेच पसंत केले आहे.

त्यामुळे गावोगावचे ,रस्ते, चौक,पार याठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात थांबली आहे.

ग्रामदक्षता कमिटया ,पोलीस व आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेतली जात आहे. अनेक ठिकाणी जनजागृती अभियान ही स्पिकरद्वारे राबविले जात आहे.
लाँकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. फक्त मेडिकल्स दुकाने, कूषी दुकाने, दवाखाने, पेट्रोल पंप ,दुध संकलन केंद्रे
दिलेल्या वेळेत सुरू ठेवली जात आहेत.

फोटो.. लाँकडाऊनमुळे औंध परिसरातील रस्ते ,पेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.