शिखर शिंगणापूर : तीर्थक्षेञ शिखर शिंगणापुर हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.शिंगणापुर गावामधील डोंगर भागात वनसंपदा वाढविण्यासाठी विशेष काम होणे अपेक्षित आहे.
माण तालुक्यात सदैव पडणाऱ्या दुष्काळवर मात करण्यासाठी बिहार पँटर्न राबविण्याचे काम संपूर्ण माण तालुक्यात सेवाभावी संस्थाकडून सुरू आहे.या सामाजिक उपक्रमासाठी युवा शक्तीचा मोठा हातभार लागत आहे.
सामाजिक वनीकरण करण्याबाबत दुष्काळी तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सुरू आहे.वनसंपदा वाढणे.दुष्काळी कंलक पुसण्यासाठी भरपूर प्रमाणात वृक्षलागवड होणे गरजेचे आहे.
हा उद्देश ठेऊन शिंगणापुर गावातील युवकानी वडगाव सरपंच व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांची भेठ घेतली.त्याच्याकडून तीर्थक्षेञ शिंगणापुर गावामध्ये वृक्षलागवड करण्यासाठी सुमारे १५० झाडे घेण्यात आली.वनसंवर्धन ही काळाची गरज आहे.झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेचा गुरूमंञ व मार्गदर्शन वडगावचे सरपंच ओंबासे , पाणी फाऊंडेशनचे अजित दादा पवार व शितोळे साहेब यांनी केले.त्याचप्रमाणे सदरची झाडे वडगाव वरून घेऊ येऊन उमाबनातील घोरपड तळ्याशेजारील डोंगरभागात वृक्षलागवड करण्यात आली. शिंगणापुरमध्ये पर्यटन स्थळ विकसित होण्याबरोबर पर्जन्यमान वाढीसाठी विशेष प्रयत्न म्हणून पवन कुदळे , अजित कर्चे , सौरभ तोडकर , शिवराज भोसले , विनय मेनकुदळे , शंकर बोडरे , ऋषी पवार या युवकानी वृक्षलागवड केली. आली. त्यामध्ये जांभळ, करंज , जंगली तरवड , चिंच अशा झाडाची लागवड केली.
तीर्थक्षेञ शिंगणापुरमध्ये डोंगरामाथ्यासह संपूर्ण डोंगर भागात वनक्रांती करण्याचा मानस युवक वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.
वनसंपदा टिकवणे हाच माझा ध्यास : शंकर बोडरे [वृक्षप्रेमी]
तीर्थक्षेञाच्या ठिकाणी हरितक्रांती करण्यासाठी माझे योगदान कायम असणार आहे.गावामध्ये झाडाची संख्या वाढण्यासाठी विशेष काम करणे काळाची गरज आहे. पावसाचे प्रमाण वाढणे .निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे.
सुमारे ५०० झाडे या परिसरात लावण्यात आली आहेत. आणखीन झाडे लावली गेली पाहिजे.त्याचे संगोपन मी तन मनाने करेन. वनसंपदा वाढण्याबरोबर टिकवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन.
शिखर शिंगणापुरमध्ये वृक्षारोपण करताना युवा शक्तीचा फोटो.