- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सामाजिक कार्यकर्ते गोविंद खंडू माळी(कानडे) यांची मुलगी सत्यशोधिका माया माळी आणि सत्यशोधक संग्राम सोपान जाधव यांचा कोणताही गाजावाजा न करता महात्मा जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात सांगितलेले पद्धतीने रहाते घरी अमृता फॉर्म,मुसळगांव येथे रविवार दि.19 जुलै 2020 रोजी सकाळी.9.30.वाजता सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
हा विवाह कोव्हिडं 19 चे नियमाप्रमाणे व अंधश्रद्दा , कर्मकांड यांना फाटा देत सत्यशोधक पद्दतिने पुणेचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष विधिकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक विनामूल्य लावणार आहेत तर महात्मा फुले रचित मंगलाषटकाचे गायन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे करणार आहेत.
या विवाहाची रजिस्टर नोंदणी करून वधू वर यांना याप्रसंगी बहुउद्देश्यीय सत्यशोधक केन्द्रातर्फे सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली जाणार आहे तर आई वडिलांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे.तसेच वर वधूच्या शुभहस्ते सर्वाना विवाह निमित्त महापुरषाचे ग्रंथ वाटप केले जाणार आहे अशी माहिती संयोजक रघुनाथ ढोक यांनी दिली आहे
