आटपाडी :प्रतिनिधी:
बांधकाम विभागाला जाग येणार का. ?
सध्या आटपाडी तालुक्यातील अनेक रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभाग झोपलेल्या अवस्थेत आहे.आज तालुक्यातील अनेक काम मंजूर असताना ठेकेदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक रस्त्यांच्या कामाचा अद्याप शुभ मुहूर्त लागलेला नाही तर काही गेली वर्षे अर्धवट काम राहिलेली आहेत.आज नविन झालेल्या अनेक रस्त्यावर पाईपलाईनसाठी चारी काढलेल्या ठिकाणी संबंधितांनी त्याठिकाणी खडी टाकून ना रस्ता दुरुस्ती केली त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असते.अश्या ठिकाणी बांधकाम विभागाचे लक्ष राहिले पाहिजे व वेळीच रस्ता दुरुस्ती केली पाहिजे.
सध्या लिंगीवरे-दिघंची रस्ता डांबरीकरनाचे काम मंजूर होऊन दोन वर्षे झाली आहेत , पण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अद्यापही ठेकेदारांने रस्ता उकरून कामच अपूर्ण ठेवलं आहे.या संदर्भात ठेकेदाराला काही नागरिकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. या रस्त्याच्या काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्त्याच्या रुंदीकरणा साठी बॉक्स कटींग भरलेली खडी निघून गेलेली आहे व त्यामुळे मुख्य रस्ता खराब झालास आहे त्यातच रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग टाकल्याने अजून अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे होत आहे,तसेच वाहनचालकाची मोठी कसरत होत आहे.
दिघंची मोठी बाजारपेठ असल्याने अवजड व लहान वाहनांची मोठी रहदारी या रस्त्यावर होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच असून यास ठेकेदारास जबाबदार धरून ठेकेदारावर कडक कारवाई करावी .सदर या रस्त्यावरून लोकांची वाढती रहदारी आहे लोकांना करण्यासाठी अतिशय त्रास होत असून तरी सदरचे काम त्वरित सुरू न केल्यास सोमवार दिनांक 27/0 7 /2020 पासून सोशल डिस्टन्स नियम पाळून व इतर कोरोना संदर्भातील शासकीय नियमांचे पालन करून तहसील कार्यालयासमोर दिघंची ग्रामपंचायत सदस्य पंच सागर ढोले यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला असून याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे.
तरी त्वरित बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास सूचना करून कामात सुरुवात करावे,अशी मागणी संदर्भात निवेदन आटपाडी तहसीलदार सचिन लंगोटे साहेब, पोलीस निरीक्षक कांबळे साहेब व बांधकाम विभागात हे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर दिघांची लिंगीवरे राजेवाडी या सर्व भागातील ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहे.
