इंदापूर : प्रतिनिधी :
इंदापूर शहरातील ४ जणांचा समावेश.इंदापूर शहर व तालुका परिसरातील एकाच दिवशी १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ६१ जणांचे घशातील स्त्रावांचे स्वॅब तपासणीकरिता प्रयोग शाळेमध्ये तपासणी करिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितली.
यामध्ये, इंदापूर शहरातील ४, इंदापूर तालुक्यातील
कळंब येथील १, निमगांव केतकी येथील ३, वरकुटे येथील ५, अकोले येथील १ अश्या एकूण १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
इंदापूर शहर व तालुक्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.