इंदापूर : वार्ताहर शहरात एकाच दिवसात दोन कोरोनारुग्ण सापडल्याने प्रशासनाने पुकारलेल्या आजच्या (दि.१४ जून) एक दिवसाच्या जनता कर्फ्यूस रविवार असून देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औषधाची दुकाने व काही जीवनावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद होते. दरम्यान कसबा पेठेतील विलगीकरण कक्षात असणा-या एकोणीस जणांचे स्वॅबचे नमुने पुण्यात पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल उद्या येणार असल्याची माहिती उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.