पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लोणंद मुले नंबर 1 शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेल्या कुमार विराज वीरसिंग शिंदे राहणार सालपे, तालुका. फलटण, जिल्हा.सातारा या विद्यार्थ्याने नॅशनल स्कॉलरशिप सर्च परीक्षेत 200 पैकी 176 गुण मिळवून राज्यात बारावा क्रमांक पटकवला आहे. त्याचबरोबर लोणंद ता. खंडाळा जि. सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन शिक्षकांची प्रेरणा घेत त्याने यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, शिक्षक, व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.
