संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान


सरपंच द्रौपदा देवकर व नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर यांच्या हस्ते पादुकापूजन


इंदापूर / वडापूरी  प्रतिनीधी  (दि.२७)
        रेडा (ता. इंदापूर)  येथील संत गुलाबबाबा मंदिरातून संत गुलाबबाबा पालखीे पायी वारीचे  पंढरपूरकडे प्रस्थान (दि.२५ ) रोजी करण्यात आले.  सायंकाळी ६ वा. रेडा गावचे सरपंच द्रौपदा सुभाष देवकर आणि नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर यांच्या हस्ते पादुका पूजन करून करण्यात आले.  यावेळी  मानाचे अश्‍व, मानाची रथाची बैलजोडी यांचेहीे  पूजन करण्यात आले.
        यावेळी सोशल डिस्टन्स तंतोतंत पालन करत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जो सोशल डिस्टन आणि नियमावली प्रमाणे पालखी सोहळ्यास परवानगी दिल्यानंतर मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत  सात दिवसाचा  संत गुलाबबाबा पालखी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव बाबुराव देवकर यांनी यावेळी दिली.
        संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे हे  १५ वे वर्ष असून आज पर्यंत संत गुलाबबाबा कृपेने पालखी सोहळ्याला कुठलीच अडचण आली नाही अनेक भक्तांना बाबाचे आशीर्वाद लाभल्यामुळे सर्वांना सुख आणि समाधान , परमानंद अमृतवाणीचा लाभ  भेटला आहे .
    तसेच बावडा येथील बागल फाटा, श्रीपुर मायनर सेक्शन  दत्तमंदिर, बंडीशेगाव,  कोळ्याचा मळा,  वाखरी, पंढरपुर असे मुक्काम करत  दर मजल करत पंढरपूर कडे जात असतो .
 कोरो व्हायरसमुळे आलेल्या संकटामुळे हा पालखी सोहळा अतिशय साधेपणाने करण्याचा संत गुलाबबाबा संस्थांन विश्वस्त मंडळीच्या बैठकीत निर्णय घेतला. शासनाने  जे नियम घालून दिले आहेत व  अटी शर्तीवर हा पालखी सोहळा संपन्न होत आहे.
      या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातून,  भारत देशातून,  परदेशातून अनेक भक्त येत असतात. पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा  मान रेडा गावचे रहिवासी  शिवाजी जाधव यांच्या सर्जा आणि लाडक्या बैलजोडीला असतो . अनेक भक्त मंडळी भोजनाच्या पंगती देत आसतात . इंदापूर व आजूबाजुच्या तालुक्यांमधील संत गुलाबबाबा भक्तांची मोठी गर्दी  पालखी सोहळ्यासाठी होत असते.
या पालखी प्रस्थानांसाठी अतिथी म्हणून जिमी अल्मेडा मुंबई,  सोनू मामा भाटिया संत गुलाबबाबा संस्थान,  अध्यक्ष काटेल धाम , तालुका संग्रामपुर , जिल्हा बुलढाणा,  ज्ञानेश्वर भाऊ उमक संत गुलाबबाबा समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष टाखरखेड मोरे , तालुका अंजनगाव सुर्जी,  जिल्हा अमरावती, चंद्रकुमार अग्रवाल, दिनेश सुंद्राणी रायपूर, अॅड. गोपाल उमक, दामोदर वानखेडे,डॉ.शिवाजीराव पाटील,  उल्हास आदाते मुंबई, जयंत मामा विरार, संजय थोरात मुंबई, बाबासाहेब दगडे ठाणे, शाहीर मुरलीधर लोणाग्रे,प्रकाश देशमुख मुंबई, नंदुभाऊ पालुंदरकर शहापुर, निशांत गायकवाड मुंबई,  संजय खाडे, संजय देवकृष्ण साळी पुणे ,नथुकाका रोकडे नागपुर ,राजन खाडे ठाणे, दिनेश देशमुख  औरगांबाद , रामदासभाऊ पावशी,  झी मिडियाचे प्रशांत अंकुशराव, आर्या अंकुशराव, सुषमाताई गायकवाड मुंबई, नम्रता पवार पुणे, अॅड. योगेश देवकर आणि नंदुरबार येथून राजू बागुल त्यांची सर्व भक्त मंडळ ,  पुणे येथून विश्वास पवार त्यांची सर्वभक्त मंडळ,अलिबाग वरून बाळूभाऊ लाड  आणि त्यांचे सर्व भक्त मंडळ , औरंगाबादचे  राम पंडित आणि त्यांची सर्व भक्त मंडळ, कोपरगाव वरून ऐकनाथ जाधव, टेलर यांचे भक्त मंडळ अशा अनेक भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाब बाबांचे भक्त येत असतात .
त्यामध्ये अनेक व्यवसायिक, उद्योगपती भक्त मंडळी या सोहळ्यासाठी सामील होत असतात आणि मोठ्या दिमाखात हा रेडा तालुका इंदापूर येथून ते पंढरपूर येथे पालखी सोहळा पायवारी होत असतो अनेक भक्तगण असतात .
या पालखी सोहळ्यास बँडपथक, सराफवाडी (ता. इंदापूर) येथील अवदुत कासार  यांचे अश्व असते.  संत गुलाबबाबा पालखीरथाचे सारस्थ प्रकाश मिसाळ हे गेली अठरा वर्षे  प्रकाश मिसाळ असे अनेक भक्त उपस्थित असतात. मानाचे तुळशी, विणकरी ,मृदंगाचार्य, वाहन सहकार्य , मानाचे चोपदार , भोजन कमिटी स्पीकर व्यवस्था,  वैद्यकीय सेवा, आचारी,  तंबू सहकार्य असे अनेक मंडळी सहकार्य करत असतात.
 संत गुलाबबाबा पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर  (दि.२५) जुलै संध्याकाळी सात ते आठ या वेळेत  फेसबुक लाईव्ह भजनाचा कार्यक्रमाचा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील भक्तांनी या श्रवनाचा लाभ घेतला.
 या पालखी प्रस्थान सोहळ्यास संत गुलाबबाबा संस्थानचे विश्वस्त,सचिव,  रेडा गावाचे सरपंच द्रौपदा  देवकर, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर , संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर , ग्रा. सदस्य, रेडा वि.वि.का.चेअरमन व संचालक तसेच तुकाराम जगदाळे, तुकाराम देवकर, प्रा.आत्माराम देवकर, नानासाहेब देवकर,धनंजय गायकवाड,काशिनाथ देवकर,  पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष,टीव्ही रिपोर्टर कैलास पवार,सोमनाथ देवकर,संतोष देवकर,महाराज अशोक मोहिते,महाराजअनिल मोहिते, महाराज उंबराव  देवकर,माजी उपसरपंच भीमराव यादव, महाराज सोमनाथ  पोळ,  दिलीप देवकर,गणपत शिंदे, बापू शिंदे अनेक मान्यवर   उपस्थित होते.