माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सलून व्यवसायिकांना परवानगी.

                                                           

●नाभिक संघटनेच्या वतीने श्री. पाटील यांचे आभार

इंदापूर : प्रतिनिधी (दि. २६)                                                 
          देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर तसेच विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाभिक संघटनांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा केल्याने अखेर  सलून व्यवसायिकांना त्याचा व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली असल्याची माहिती  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
               श्री. पाटील म्हणाले की,  लॉकडाउन नंतर अनेक व्यापारी व्यावसायिकांना आपले दैनंदिन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. परंतु  नाभिक व्यावसायिकांना आपले सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळालेली नव्हती. सलुन व्यवसायिकांचे सर्व जीवनमान हे त्यांच्या सलुन व्यवसायावरतीच अवलंबून असते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात या संघटनेचे महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना कल्याण दळे आणि तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आपल्याकडे निवेदन दिले होते. निवेदनात दिलेल्या मागण्यांसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहार, भ्रमणध्वनी द्वारे केलेल्या संपर्कामुळे, पाठपुराव्यामुळे सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. व्यवसायिकांना आपले दैनंदिन व्यवहार सुरू करून आपले अर्थार्जन करता येणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
     सलून व्यवसायास परवानगी मिळाल्याने नाभिक संघटनेने हर्षवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त केले असून सलून व्यवसाय सुरू होणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.