लक्ष्मणराव खटके
आटपाडी /प्रतिनिधी:
             छत्रपती राजर्षि शाहु महाराज जयंतीच्या निमित्ताने पुण्याच्या भरारी ग्रुपच्या वतीने कोथरूड येथे आयोजित सर्वरोग निदान शिबीरात ६५० जणांची मोफत तपासणी करण्यात आली .
          समतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार  करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सर्वार्थाने लोकराजे होते. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व कोरोनाच्या महामारी संकटात एक सामाजिक बांधिलकी या नात्याने भरारी ग्रुपच्या वतीने कोथरूड़ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरीच्या सहकार्याने संपन्न झाले .
           भरारी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सुभाष सातपुते यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शना खाली आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात
त्यामध्ये प्रामुख्याने डोळे तपासणी,गुडगेदुखी, बीपी, दमा, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, आहार कसा असावा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असले पाहिजे,  तुमच्या पोटातील अवयवाभोवती किती चरबी आहे ,तुमच्या पुर्ण शरीरात किती चरबी असली पाहिजे सध्या किती आहे ., या सर्वांविषयी तपासणी करुन योग्य तो औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले . या शिबिराचा 650 लोकानी लाभ घेतला.
     या शिबिरस्थळी पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, तहसीलदार पुनाजी कोथेरे,हनुमान व्यायामशाळा अध्यक्ष सचिन सातपुते, कात्रज दुध संघाचे चेअरमन रामभाऊ ठोंबरे, सुर्या केमिकल चेअरमन मारुती खरात, आम्ही सांगलीकरचे अध्यक्ष अरुण कदम यानी सदीछया भेट देऊन भरारी ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.
       सदर कार्यक्रमात सोशल डिस्टनसचे सर्व नियम पाळण्यात आले. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी डी.वाय.पाटील हॉस्पिटल सर्व स्टाफने व भरारी ग्रुपचे शैलेश घाडगे, संतोष इंगळे, भगवान खसे, दिपक पाटील, विशाल जगताप, मोहन चौगुले, शुभदा भोसले, श्रद्धा ढोकळे,सानिका पाटील आदी युवानी परिश्रम घेतले.