इंदापूर शहर उद्यापासून दोन दिवस बंद राहणार

     


 इंदापूर  : वार्ताहर   (दि. १६)   
    
                                   इंदापूर शहरातील कसबा परिसरातील ३८ वर्षीय महिलेच्या कुटुंबातील ९ जणांची कोरोना चाचणी अहवाल आज दि.१६ रोजी पॉझिटीव्ह आले आहेत.  या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इंदापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने  शहरामध्ये उद्या दि. १७ आणि दि.१८ या दोन्ही दिवस कडकडीत बंद पाळला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने जाहिर केले आहे. 
या बंदमधून हॉस्पिटल व मेडिकल सेवा वगळणेत आल्या आहेत.                                                        तसेच शुक्रवार दि.१९ जून पासून एक आठवडा शहरातील सर्व व्यवहार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू राहतील.                                                तरी शहरातील  नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरी राहून  प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, भरत  शहा, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास  कदम, विरोधी पक्षनेते पोपटराव शिंदे,  गटनेते गजानन गवळी, सर्व नगरसेवक व इंदापूर शहर व्यापारी महासंघ पदाधिकारी यांनी शहरवासीयांना  केले आहे.