इंदापूरात नऊ कोरोनाग्रस्त, तीन बालकांसह एका वृध्देचा समावेश



 इंदापूर : वार्ताहर
      शहरात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ४० जणांपैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे खळबळजनक वृत्त आहे. त्या मध्ये तीन बालकांचा समावेश आहे.
  कसबा पेठेत एका दांपत्याची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यामधील महिला कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले होते. मंडई परिसरातील नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. या दोन्ही ठिकाणच्या त्यांच्या संपर्कात आलेल्या चाळीस जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीस  पुण्याला पाठवण्यात आले होते. काल रात्री उशीरा त्यांचा अहवाल मिळाला.
  त्यामध्ये नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.