इंदापूर : प्रतिनिधी .
रेडा ता. इंदापूर येथे नरेगा योजनेअंतर्गत ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ
जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. 23 ) रोजी इंदापूर तालुक्यातील रेडा गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ओढा खोलीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ जि.प.सदस्य अभिजीत तांबिले यांच्या हस्ते करण्यात आला.
जि.प.सदस्य अभिजीत तांबिले म्हणाले की, ओढा खोलीकरण काम अंदाजपत्रक रुपये ४ लाख ९८ हजार असून या कामासाठी आज रेडा गावामध्ये ३० पुरुष आणि २५ महिला उपस्थित आहेत. मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम या धोरणानुसार नरेगा योजनेअंतर्गत रेडा गावात मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यापुढेही रेडा गावाला विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कमी पडणार नाही. आतापर्यंत आमदार फंडातून ५ लाख व जिल्हा परिषद फंडातून जवळजवळ ६५ लाख (७० लाख) रेडा गावासाठी निधी दिला आहे .
मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देऊन रेडा ग्रामपंचायतीने इंदापूर तालुक्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे, असे जि.प. अभिजीत तांबिले यांनी सांगितले.
यापुढेही रेडा ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे काम मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट त्यांचे सहकारी सौ. पूनम भोसले, सचिन राऊत यांनी मार्गदर्शन केले.
मजुरांना काम करण्यायासाठी लाईन आऊट करून देऊन कामाचा शुभारंभ केला. सर्व मजुरांना योजना समजून सांगितली.
या कार्यक्रमास जि.प.सदस्य अभिजीत तांबिले यांसह सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नरेगा पंचायत समिती इंदापूर पूनम भोसले, तांत्रिक अधिकारी नरेगा सचिन राऊत, ग्रामविकास अधिकारी भगवान घोगरे, रेडा गावचे सरपंच द्रौपदा देवकर, ग्रामपंचायत सदस्य व निवृत्त पोलिस अधिकारी उत्तम पवार, ग्राम रोजगार सेवक बाबासो पवार, ग्रा.पं. सेवक गणेश वाघ, रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी अडसूळ, शर्मिला देवकर, रामचंद्र मोहिते, उत्तम पवार,प्रा.आत्माराम देवकर, ग्राम रोजगार सेवक बाबासो पवार, ग्रा.पं. सेवक गणेश वाघ, माजी ग्रामपंचायत सदस्य व रेडा वि.वि का. सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर देवकर, युवा नेते नानासाहेब देवकर,युवक अध्यक्ष धनंजय गायकवाड, अॅड. योगेश देवकर, तुकाराम देवकर, विकास देवकर, शिव छावा महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रोहिदास भोसले, सुनील मोहिते, दशरथ सफकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
_______________________________
चौकट : रेडा गावाला विकासनिधी कमी पडू देणार नाही : जि. प. सदस्य अभिजीत तांबिले.
रेडा ग्रामपंचायत विकास कामाला निधी कमी पडून देणार नाही. रेडा गाव हे माझ्या जिल्हा परिषद गटांमध्ये येत असून या गावांमधील नागरिकांचे व माझे जिव्हाळ्याचे संबंध असून ग्रामदैवत सर्जनाथाच्या साक्षीने सांगतो मी कुठल्याही रेडा गावच्या कामांमध्ये दुजाभाव करणार नाही. त्याचं काम करा, ह्याचं काम करू नका, हेच काम करा, हा आपला तो आपला नाही असा दुजाभाव करणारा मी कार्यकर्ता नसून रेडा गावच्या प्रत्येक कामाला जि. प. सदस्य या नात्याने प्रथम शिफारस देत असतो. आतापर्यंत रेडा गावासाठी ६५ लाख जिल्हा परिषद माध्यमातून निधी देण्यात आला असून आणि आमदार फंडातून पाच लाख रुपये असा जवळजवळ ७० लाख रुपये निधी रेडा गावासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे अभिजीत तांबिले जि. प. सदस्य रेडा गावासाठी कुठलीच मदत करत नाही किंवा एकही काम मंजूर त्यांनी केलं नाही अशा अफवा कुणी विनाकारण पसरवून रेडा गावातील नागरिकांमध्ये गैरसमज करू नयेत.
