केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा इंदापूर काँग्रेसच्या वतीने निषेध


     
इंदापूर : प्रतिनिधी
30जून.

      इंधन दरवाढीमुळे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत व काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केंद्र शासनाचा निषेध केला आहे. दरवाढ मागे न घेतल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
   
      कोरोना व नंतरच्या लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस अडचणीत आला आहे. निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात केंद्र शासन अपयशी ठरले आहे.

     या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणिवपूर्वक वाढवत आहे.त्यामुळे सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने ही अन्यायकारक पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा काँग्रेस पक्ष या विरूद्ध तीव्र आंदोलन करेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

     निवेदनाखाली काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, काकासाहेब देवकर, जकिरभाई काझी, बिभीषण लोखंडे, चमनभाई बागवान, भगवान पासगे, निवास शेळके, तुषार चिंचकर, संतोष शेंडे, सुरेश लोखंडे व दत्तु देवकर यांंच्या सह्या आहेत.