सातारा -विनायक भिसे यांजकडून:-
आज लोकांची प्रतिकारशक्ती वाढणे अत्यंत आवश्यक आहे.सध्या उद्भवलेल करोना विषाणूचे संकट फक्त संकट नसून मनुष्या विरूद्ध सुक्ष्म जिवांचे युद्ध आहे.आपल्याला हे युद्ध जिंकायचे असेल तर वर्तमान स्थितीत आपल्याला आपली प्रतिकार शक्ती वाढविणे नितांत गरजेचे आहे असे प्रतिपादन कोरेगाव-खटावचे आमदार महेश शिंदे यांनी केले . खटाव ग्रामपंचायत व दक्षता कमीटी यांच्या वतीने खटाव वासियांना ' आर्सेनिक अल्बम 30'या प्रतिकारशक्ती वाढवणा-या गोळ्यांच्या वितरणाच्या शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते.या छोटेखानी कार्यक्रमा प्रसंगी योग्य ती खबरदारी घेऊन खटावचे माजी जि.प.सदस्य अशोक कुदळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की खटाव ची लोकसंख्या एवढी असूनही आजपर्यंत खटाव मध्ये एक ही करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही.याचे सर्व श्रेय जाते ते सत्ताधिश व विरोधकांनी एकत्र येऊन केलेलं योग्य नियोजनालाच.आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या एवढ्या मोठ्या गावात वाटप करणारी पहिली ग्रामपंचायत खटाव आहे . पुढे ते म्हणाले बाहेरुन येणाऱ्या आपल्याच बांधवांना काही काळ आपल्या गावाच्या आरोग्यासाठी इन्स्टिटूशन्ल कांरंन्टाईन करणं आवश्यक आहे.काही अपवादात्मक परिस्थितीत होमक्वारंन्टाईनला परवानगी दिली जाते.परंतू होम क्वारंन्टाइन चा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे .होम क्वारंन्टाइन केलेल्या घरापासून किमान ५०मीटर अंतर असणे आवश्यक आहे.त्या घरातील हवा सुद्धा बाहेर येणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी ते म्हणाले की मी सामाजिक बांधिलकी म्हणून १४२० गरजूं कुठूंबाना स्वखर्चाने अन्न धान्य वितरण केले.ज्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे अशा जवळपास साडे सहाशे कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे.आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना प्रत्येकी २००० रूपयांची आर्थिक मदत केली. अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे जवळपास एक लाख कुटुंबांना वितरण केले आहे. अता बहुतांश ठिकाणचे लॉकडाऊन संपले असून अनलॉक चालू झाले आहे.प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढवून खबरदारी घेणे गरजेचे आहे.यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी अनुदानित फळबाग लागवडीचा सल्ला देखील दिला.
या समयी सरपंच नंदकुमार वायदंडे व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली . सर्व प्रथम आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप समाजातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पत्रकारांना करण्यात आले.करोना संकटात गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्या मार्फत आपापल्या वार्डात घरपोच गोळ्या देण्यात येतील असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कुदळे यांनी केले.आभार राहुल पाटील यांनी मानले