कोरेगाव तालुक्यात आले लागवड जोरात सुरू



 पिंपोडे बुद्रुक / प्रतिनिधी .

मान्सूनपूर्व पावसामुळे आले लागवड वेगात सुरू झाली आहे तापमान वाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी लागवड रखडली  होती शेतकरी पावसाच्या व वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून  होते येत्या काही दिवसात वातावरणात बदल झाल्यामुळे व मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे आले लागवड वेगात सुरू झाली आहे आले पीक लागवडीत सातारा जिल्ह्यात  कोरेगाव तालुका महत्त्वाची भूमिका बजावतो जिल्ह्यात सुमारे 2000 ते 2100 हेक्टर आल्याची लागवड  होते. सातारी, औरंगाबादी, उदयपुरी ,सुप्रभात जातीची आले पीक लागवड केली जाते .
गेल्या दोन वर्षापासून आले  पीककला  बऱ्यापैकी दर असल्यामुळे उत्पादक शेतकरी आले पिकाकडे वळला आहे उसाला पर्याय म्हणून आले पिकाकडे शेतकरी बघत आहेत सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुळे शेतकरी कोणत्या पिकाकडे वळायचे भाजीपाला दर नसल्यामुळे शेतकरी आले या पिकाची लागवड करीत आहेत.