औंध:-पुसेगाव-औंध-म्हासुर्णे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे मागणी औंध येथील माजी सैनिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
औंध येथे सार्वजनिक बांधकाम विभागात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे,रस्त्यात अनेक पूल अर्धवट अवस्थेत आहेत,या रस्त्यावरून शेकडो वाहने ये-जा करीत असतात,पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे रस्त्याच्या अनुषंगाने असणारी सर्व कामे पूर्ण करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जयसिंग घार्गे,बाबा गोसावी,धनाजी आमले, वसंत पवार, चंद्रकांत पवार,गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
फोटो:-पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणीचे निवेदन देताना जयसिंग घार्गे,बाबा गोसावी,मेजर धनाजी आमले ,मेजर वसंत पवार,चंद्रकांत पवार,गणेश चव्हाण उपस्थित होते.
