पीएसआय किरण अवचर यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक जाहीर .




  इंदापूर -  वार्ताहर

गंलाडवाडी नं.२  (ता.इंदापूर) येथील रहिवासी व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण नामदेव अवचर यांना केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागातील चामोर्शी पोलीस स्टेशन येथे तीन वर्षे पोलीस निरीक्षक म्हणून अत्यंत खडतर परिस्थितीत सतत धाडसाने केलेल्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने हे पदक जाहीर केलेले आहे.
किरण अवचर यांचे माध्यमिक शिक्षण इंदापूर येथील नारायणदास रामदास विद्यालयात झाले. सन १९९१ मध्ये त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेतली. गेल्या २७ वर्षांच्या पोलीस खात्यातील सेवेत एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.