दिघंचीत उर्वरित टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू... निंबाळकर तलावात पाणी लवकरच येणार..



आटपाडी प्रतिनिधी/बापूसाहेब नामदास
   
दिघंचीत उर्वरित टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू..


निंबाळकर तलावात पाणी लवकरच येणार..

दिघंची कडे येणाऱ्या टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन च्या कामाचा शुभारंभ शनिवारी तानाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षी दहा किलोमीटर एवढे बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले असून उर्वरित राहिलेले काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर थेट निंबाळकर तलावात पाणी सोडले जाणार आहे अशी माहिती तानाजीराव पाटील यांनी दिली
      या शुभारंभ प्रसंगी तानाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील इंच न इंच  जमीन ओलिताखाली आम्ही कटिबद्ध आहोत. मागील वर्षी ऐन दुष्काळात तब्बल दहा किलोमीटर पाईपलाईन पूर्ण करून दिघंची मध्ये टेंभू योजनेचे पाणी आणले . आता राहिलेली उर्वरित पाईपलाईनचे काम सुरू केले असून येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल त्यानंतर थेट पाणी निंबाळकर तलावात जाण्यात काही अडचण नाही. त्यानंतर पाईपलाईन गावामधील ओढ्यापर्यंत आणली जाणार असून यादव वस्ती बंधारा कायमस्वरूपी भरण्याची तरतूद केली आहे तसेच परिसरातील  बंधारे, पाझर तलाव टेंभू योजनेतून भरण्याची देखील तरतूद केली आहे अशी ग्वाही तानाजीराव पाटील यांनी दिली.
      पाईप लाईन लवकरात लवकर पूर्ण करून दिघंची करांना यापुढे टेंभूचे आवर्तन सुरू झाल्यानंतर थेट निंबाळकर तलावात पाणी मिळणार आहे असे मत सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केले शुभारंभ प्रसंगी अरविंद चव्हाण, दत्तात्रय पाटील ,साहेबराव पाटील ,सदाशिव यादव, शेखर मिसाळ ,सागर ढोले ,राजेश नांगरे व इतर ग्राम सदस्य आदी मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते