पिंपोडे बुद्रक : (प्रतिनिधी).
चौधरवाडी ता.कोरेगाव येथे बैलगाडी शर्यतीस बंदी असताना कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.
वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत चौधरवाडी तालुका कोरेगाव या ठिकाणी रविवार दिनांक 28 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजन्याच्या सुमारास पदूबाईचा माळ येथील आबासो मारुती पिसाळ यांच्या पडीक मोकळ्या जागेत माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून जमावबंदी तसेच तोंडाला मास्क न लावल्यामुळे सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले.
तसेच सर्वोच्च न्यायालयाचे बैलगाडी शर्यती बंदी उल्लंघन करून बैलांना निर्दयपणे शर्यतीच्या बैलगाडीस जुंपून चाबकाने व काठीने क्रूरपणे मारहाण करून बैलगाडी पळवीत असताना मिळून आले.
याप्रकरणी वाठार पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पदूबाई च्या शिवारात जाऊन रोहित माणिक पवार (गुंड्या) रा.नांदवळ, अक्षय दत्तात्रय शिंदे रा. चौधरवाडी, विक्रम लहू जाधव रा.वाठार स्टेशन, शुभम मधुकर सावंत रा.पिंपोडे बुद्रुक.या बैलगाडी चालकांवर गुन्हे दाखल केले. बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या दहा ते पंधरा लोकांनी पोलिसांचा सुगावा लागताच तिथून पलायन केले. पुढील तपास एएसआय धुमाळ करीत आहेत.
