इंदापूर : प्रतिनिधी . लाॅकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत 'युवा क्रांती प्रतिष्ठान' च्या मदतकार्यास भरीव योगदान दिल्याबद्दल नगरपरिषदेच्या महिला विकास व बालकल्याण समितीच्या समितीच्या सभापती नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांना 'युवा क्रांती प्रतिष्ठान' च्या वतीने सन्मानपत्र बहाल करण्यात आले. युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत सिताप, सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे यांच्या उपस्थितीत हे सन्मानपत्र देण्यात आले. दि.१८ मार्च ते १३ जून या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत इंदापूरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीब,गरजू, निराधार व मनोरुग्ण यांना युवा क्रांती प्रतिष्ठानच्या मदतकार्यास मिळालेल्या आपल्या योगदानामुळे दररोज दोनवेळ घरचे जेवण उपलब्ध होऊ शकले. शुभकार्य,वाढदिवस,वास्तुशांती नातेवाईकांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदापूरातील माय माऊली,विविध सामाजिक संघटना,दानशूर व्यक्तिमत्वांनी माणूसकी ही एकच जात व एकच धर्म या तत्वाने अन्नदानाचा यज्ञ अविरत चालू ठेवला. इंदापूरकरांच्या दानशूर वृत्तीला'युवा क्रांती प्रतिष्ठान'चा मानाचा सलाम. आत्ता जनजीवन पुर्वपदावर आल्यामुळे अन्नदानाच्या कार्यास स्वल्पविराम देत आहोत. भविष्यात समाजाला सेवेची गरज पडेल तेव्हा आपण पुन्हा सेवेस हजर राहूया,असे सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.