पळसखेल ता.आटपाडी विकास सेवा सोसायटीत भ्रष्टाचार, शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा




  ═════════════
 ═ग्रामीण महाराष्ट्र न्युज═
  ═════════════
राजेवाडी : प्रतिनिधी.

● पळसखेल विकास सेवा सोसायटी वर शेखर रणदिवे यांचे भ्रष्टाचाराचे आरोप..
 ● त्वरीत चौकशीची न झालेस आमरण  उपोषण करण्याचा दिला इशारा.
चेअरमन व सचिव यांच्या संगनमताने सुरु आहे, भ्रष्टाचार.
   ═════════════
    मौजे पळसखेल विकास सहकारी सोसायटीमध्ये सध्या अत्यंत भ्रष्टाचार चालू आहे. मार्च महिन्यातील सोसायटी फिरून घेण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अतिशय पिळवणूक झाली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खूप मोठा तोटा या सोसायटीचे चेअरमन व सचिव करत आहेत.हा प्रकार दरवर्षी घडत असल्याने योग्य शेतकऱ्यांच्या विकासाला बाधा  व अडवणूक होत आहे .
एकीकडे मात्र चक्क सदर सोसायटीमध्ये ज्यांच्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक नाही.अशाच्या उताऱ्यावर खोटे क. म. करून त्या शेतकऱ्यांना सभासदांना 2 लाख ते तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाते व त्या कर्जातील टक्केवारी चेअरमन व संचालक मंडळाला अगोदरच ठरवलेली असते .       
    प्रत्येक वर्षी पीक विमा चेअरमन आणि सोसायटीच्या घशात जातो. यांच्या भ्रष्टाचारात काही महिन्यापूर्वी एक बँक इन्स्पेक्टर निलंबित झाले 
आहेत .
 परंतु या  राहिलेल्या भ्रष्टाचाराचे लोकांचे काय सरकारची शेतकऱ्यांची फसवणूक करणारे व खोटे काम करून देणारे जे संबंधित कर्मचारी व अधिकारी असतील तसेच सोसायटीचे सचिव ,चेअरमन व संचालक बॉडी असेल किंवा बँक इन्स्पेक्टर तसेच बँकेतील कर्मचारी असतील या सर्व संबंधितांची सविस्तर पूर्ण चौकशी करून जे यात दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी. 
    अन्यथा या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण बसून न्याय मिळवावा लागेल असे शेखर रणदिवे यांनी पळसखेल विकास सहकारी सोसायटीच्या भ्रष्टाचाराच्या कामाबाबत वक्तव्य केलेले आहे .
तसेच याचे निवेदन  आटपाडी चे तहसीलदार सचिन लंगोटे साहेब, सहाय्यक निबंधक आटपाडी यांना देण्यात आले असून माहितीसाठी प्रत सहकारी मंत्री महाराष्ट्र राज्य,सहकार आयुक्त पणे,सहाययक निबंधक आटपाडी, जिल्हाधिकारी सांगली याना पाठवण्यात आलीं आहे.