पिंपोडे बुद्रुक /अभिजीत लेंभे
●पिकवणाऱ्या पेक्षा विकणारा वरचढ.
●शेतमाल पिकवुनही रास्त भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत.
शेतीमाल पिकवणारचं शेतकऱ्यास ऐन उन्हाळ्यात कोरोना महामारी च्या संकटात तीन-चार महिने कमीत कमी पाण्यात अमाप पैसा खर्च करून काढणीनंतर शेतीमाल विक्री करताना अडचणीत येत असल्याचे चित्र कोरेगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्याकडून शेतमालास तीन-चार महिने उन्हात पाणी धरुन टरबूज ,कलिंगड, टोमॅटो, वांगी, सिमला ,मिरची, पावटा, भेंडी, गवार ,कोबी या सारखी पिके काढणीनंतर विक्री करताना दहा ते बारा किलो छोट्या-मोठ्या बाजारु व्यापाऱ्यास दिले जात आहे . याच मालाची विक्री बाजारात फिरतीवर 25 ते 30 रुपये किलो दराने व्यापाऱ्यांकडून होत आहे.
याबाबत मोठी तफावत आढळून येत आहे जो तीन महिने पिकवतो त्यास कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे त्यामुळे रास्त भाव मिळत नाही ज्यांनी विकत घेतला तो तीन ते चार तासातच दुप्पट तिप्पटीच्या दराने पाणी न धरता विक्री करून भरपूर प्रमाणात पैसा कमवत आहे त्यामुळेच ही करण्यापेक्षा विकणारा हा वरचढ असल्याचे आत्ताच्या स्थितीत पहावयास मिळत आहे .विद्युत पंपासाठी वीज पिकासाठी पाण्याचे आधुनिक पद्धतीने नियोजन नांगरणी, पेरणी ,मशागत, खते, औषधे फवारणी करणे, काढणी याबाबतीत खर्च पाहता विक्रीच्या तुलनेत यानंतर शेतमालास कवडीमोल किंमत यामुळे कोरोना संसर्गजन्य साथीच्या संकटाचा सामना करताना शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाले आहे.