आटपाडी ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित आटपाडीत आयोजित रक्तदान शिबीरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला .
आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात या रक्तदान शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबुराव मुळीक यांचे हस्ते करण्यात आले .
प्रारंभी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख ,युवक अध्यक्ष सुरज पाटील , महिला अध्यक्षा सौ . अश्विनी अष्टेकर कासार , निवृत्त प्राध्यापक संभाजीराव पाटील , अधिकारी चंद्रकांत पारसे इत्यादी १०५ जणांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले .
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक ,महिला नेत्या सौ .अनिता पाटील , ओबीसी सेलचे अध्यक्ष जालीदर कटरे, , शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील , युवक उपाध्यक्ष किशोर गायकवाड, तेजस पवार , विजय पुजारी ,जितेंद्र चव्हाण , भाऊसाहेब देशमुख ,सुधीर देशमुख ,रोहीत देशमुख, नितीन डांगे , अमित पाटील , समाधान नळ , प्रशांत गवळी, सलमान शेख , दत्ता रावळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते . माणगंगा उदयोग समुहाचे आनंदरावबापू पाटील यांनी शिबीर स्थळी भेट दिली .
भारती ब्लड बॅंक सांगलीच्या डॉ . यास्मीन धत्तुरे मॅडम , रणजीत जाधव व सहकाऱ्यांनी दात्यांचे रक्त संकलीत केले .