सांगली जिल्ह्यात एनयुजे महाराष्ट्रच्या पत्रकारांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप





सांगली/ प्रतिनिधी:

सांगली जिल्ह्यात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या सर्व पत्रकारांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप  करण्यात आले.
खरसुंडी येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.उमेश पुजारी व जांभुळणी येथील बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांच्या सहकार्यातून या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. एनयुजे महाराष्ट्रने राज्य अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वाखाली  माध्यमकर्मींना ५० लाखाच्या विमा सुरक्षेची मागणी मार्च महिन्यात केली, मुंबईत ५३ पाँझिटिव पत्रकार आलेवर चौथ्या स्तंभाला मजबूत संरक्षण कवच हवे म्हणून एक कोटी रुपयाचा विमा द्यावा व त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली होती.
या  मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर केले आहे.तसेच त्यांना 50 लाख रुपयांचा विमा घोषीत केला आहे.पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. या घटकाकडे कोणाचेही लक्ष नाही. कोरोनाकाळात सर्व घटनांचे वास्तववादी वृत्तांकन पत्रकार करीत असताना त्यांना बाधित क्षेत्राचा किंवा व्यक्तींचा धोका पोहोचू शकतो. या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषधाचा फायदा होणार आहे.
 बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी सिद्धनाथ हॉस्पिटलचे डॉ.उमेश पुजारी यांच्या माध्यमातून पत्रकारांना या औषधाची सुविधा पुरवली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या  अध्यक्ष शीतलताई करदेकर यांनी सर्व सभासद पत्रकारांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन काम केले पाहिजे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचा वापर करण्याचे आवाहन केले होते.
 त्यानुसार सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सभासद पत्रकारांना या औषधाची सुविधा पुरवली आहे.
    जिल्हा संघटक देवानंद जावीर,आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते, सचिव अक्षय बनसोडे,कार्याध्यक्ष विक्रम भिसे, मार्गदर्शक हमीद शेख, भरत पाटील,सीबीएस न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक गुलचंद भोरे यांच्यासह पदाधिकारी व सभासद पत्रकारांना महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले.