─────────────
ग्रामीण महाराष्ट्र न्युज
──────────────
चेन्नई, 10 जून :
कोरोना मुळे वाढदिवसाच्या दिवशी आमदाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना चेन्नईत घडली.
जगभर कोरोना चा कहर वाढतच आहे.
यातच आता कोरोनामुळं एका आमदाराचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली.
डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.
याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. 61 वर्षीय जे अनबालागन यांचा दि. 10 जून रोजी 62 वा वाढदिवस होता.
जे अनबालागन यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली. त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.
याआधी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. दि. 9 रोजी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. कोरोना विषाणूंमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे.
यामुळे चेन्नई हादरली आहे.