शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कटिबद्ध : माजी आ. हर्षवर्धन पाटील.




इंदापूर :प्रतिनिधी -
 शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी दुधगंगा दुध उत्पादक संघाने अमूल दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या सोबत करार केला आहे. अमुलच्या माध्यमातून दुधाला योग्य दर देण्यात येणार आहे.
अशी माहिती, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक संघाचा अमूल दूध उत्पादक संस्थेशी पाच वर्षांचा करार. ८ जून पासून  दूध संकलन करण्यास सुरुवात. अमूलचे पाच अधिकारी हे या संघामध्ये प्रत्यक्षात काम करत आहेत. क्वालिटी दर्जा चे दूध संकलन होत आहे. 

२५ पैकी १४ ठिकाणच्या बल्ककुलरची उभारणी. संघामध्ये दोन लाख लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे.  सध्या दररोज पंधरा ते सोळा हजार लिटर दूध संकलन  करण्यात येत आहे.  शासनाच्या हमी भावाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचा दर देण्यात येत आहे.

 फॅट, डिग्री, कमिशननुसार दूधाला दर,  दहा दिवसाला पगार,  मा. ना. हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे  तालुक्यातील जनतेला नवीन संधी उपलब्ध.
 यावेळी दूधगंगा संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, कार्यकारी संचालक सदानंद कुलकर्णी,माजी सभापती विलासराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.