बातमी नंतर। झाडाला मिळाले कुंपण,झाडांना पुन्हा जाळ्या बसवल्या.

छाया -अजित काटकर.



    (वृतसेवा)
वरकुटे .
माण तालुक्यातील कुंपण चोरणाऱ्यांचा बसला धसका. वनखात्याने लक्ष घालून बातमी प्रसिद्ध होताच, बसविल्या झाळ्या.. आता वनखाते ठेवणार पाळत.


      वरकुटे परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांच्या जाळ्या अद्न्यात चोरट्याने काढून न्हेल्या या सदराखाली ग्रामीण महाराष्ट्र. मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
       वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तिस-याच दिवशी सामाजिक वनीकरण विभागाने त्याचिओ तातडीने दखल घेत सिद्धनाथ हायस्कूल भागशाळा माळवाडी परिसरातील झाडांना पुन्हा जाळ्या बसवल्या आहेत.
       सामाजिक वनीकरण विभाग नेहमीच ग्रामीण भागात वृक्षारोपन करीत असते त्याचे संगोपन व संवर्धन करण्यासाठीही प्रयत्न करित असते. पण काही नागरिक जाणून बुजून जाळ्या चोरून न्हेणे,झाडे जनावरांना चारणे,झाडे उपटून टाकणे असे प्रकार करित असतात. गेल्या काही वर्षात या भागात घटलेले पर्जन्यमान व वाढलेले तापमान याचेच द्योतक आहे. हे टाळण्यासाठी जरीसामाजिक वनीकरण विभागाने आपल्या गावाच्या परिसरात अशा प्रकारची झाडे लावली असतील तर त्याचे समनगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलली पाहिजे तरच अशा प्रकारचे वृक्षारोपन यशस्वी होऊ शकेल.