इंदापूर : प्रतिनिधी.
●दूधगंगा दूध संघाचा म्हशीच्या दूधाला ६२ रुपये उच्चांकी दर
●अमूल बरोबर केलेल्या कराराचा दूध उत्पादक शेतकर्यांना फायदा
●इंदापुरात दुधाला प्रतिलिटर ६२ रुपये दर
●अमूलशी झालेल्या करारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा
दुधगंगा दुधसंघाकडे दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या म्हशीच्या दुधाला दि.२५ जून रोजी प्रति लिटरला ६२ रुपये असा समाधानकारक दर मिळाला आहे.
दूधगंगा संघाकडून गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे हमीभाव मिळत आहे.
अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार २६,२७ रुपये असा ही दर मिळत आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दुधगंगा दुधसंघाचे संस्थापक, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील दूध संघाने देशातील नावाजलेल्या अमूल बरोबर नुकताच करार केला आहे.दि.८ जून पासून दुध संकलन सुरु झाले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे प्रत्येकी दहा दिवसांचे पेमेंट त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. दूधगंगा संघ हा तालुक्यातील एकमेव सहकारी दुध संघ आहे. या सहकारी दुध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव व त्यापेक्षा जादा दर मिळत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य,वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत,
अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
दुधगंगा दूध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला सर्वात जास्त दर मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

