इंदापूर नगरपरिषदेने अटल वन योजनेअंतर्गत लावलेल्या झाडांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.


इंदापूर : वार्ताहर -
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आबालवृद्ध वारकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय प्रांगणातील रिंगण सोहळा मैदानात देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे, देहूसंस्थानचे विश्वस्त मधुकर मोरे, माणिक मोरे, अजित मोरे, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या हस्ते 11 पिंपळ, चिंच, जांभूळ, वड अशी डेरेदार सावली देणाऱ्या झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर सर्वांनी नगरपरिषदेने अटल वन योजनेअंतर्गतविकसित केलेल्या वनाची पाहणी केली.

यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, नगरपरिषदेने
अटल वन योजनेअंतर्गत लावलेल्या झाडांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या शहा नर्सरीतून मोफत नेण्यात आलेली सव्वा लाख झाडे इंदापूर शहरासह पुणे, सोलापूर, नगर, सातारा, लातूर जिल्ह्यात लावून जगविण्यात आली आहेत ही कौतुकाची बाब आहे.
यावेळी सुनील मोहिते, संजय गायकवाड, कालिदास अंदुरे, चांद पठाण,मेहबूबमोमीन, गोरख माने, राहुल मारकड, अल्ताफपठाण ,अशोक चिंचकर, सुरेश सोनवणे, संतोष सूर्यवंशी, सूर्यकांत भंडारी उपस्थित होते.

  अभिनेता सयाजी शिंदे व देहू संस्थान विश्वस्तांचा सत्कार करण्यासाठी पोपट शिंदे यांनी शाल, श्रीफळ व हार आणले होते. मात्र त्यास सयाजी शिंदे यांनी नम्रपणे नकार देऊन सर्वांनी झाडे लावून ती जगवा असे आवाहन केले..