गरीबाना धान्य रूपी गिफ्ट देऊन तंटामुक्ती अध्यक्ष आंचलदास सोनवणे यांनी वाढदिवस साजरा केला.





●वाढदिवसाच्या खर्चाला दिला फाटा

मेढा(धनंजय गोरे):-वाढदिवस म्हणटल की मित्र परिवार यांना पार्टी देन  त्यावर हजारों रुपये खर्च करणारी मंडळी आपण नेहमी पाहात असतो मात्र जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ येथील एक यशस्वी व्यावसायिक, गावचे माजी उपसरपंच व विद्यमान तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष आचलदास सोनावणे यांनी आपल्या वाढदिवसाला कोरोना च्या महामारी मधे गरीब गरजू लोकांचे होणारे हाल पाहुन आपल्या मित्र मंडळीना अश्या गरजुना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली मित्रांनी देखील साथ देत अन्न धान्याची किट तयार करण्यास मदत केली
            ३१ में रोजी खर्शी गावातील गरजुना सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत गावातील सर्व ग्रामस्थाना मास्क वाटप केले,सोबतच पंधरा कुटुंबियाना रोज लागणाऱ्या आत्यवश्यक वस्तुंचे वाटप करून वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च टाळून कोरोनाच्या काळात मदतीचा हात पुढे केला,त्यांच्या या कार्याचे सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले,यावेळी सरपंच रामचंद्र मुळीक,गुलाबराव भोसले,पोलिस पाटिल सुहास भोसले,प्रमोद दिक्षित, राजेंद्र सोनटक्के,वैभव बर्गे, रोहन भोसले,सचिन भोसले यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होता