# विस्मरणातील चेहरे# लेख6
"धनगरसमाजासाठी जीवन समर्पित
करणारे एक वादळ"
●बी.के. उर्फ बापु कोकरे●
"सन 1987 मधील ग्रेट भेट.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजासाठी जिवाच रान करून आपले जीवन समर्पित करणारे आणि समाजाचा उत्कर्ष करणारे तरुण काही विरळच असतात.
यामध्ये धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारी आणि ज्यांनी आपलं जीवन समाजासाठी संपलेला एक महान व्यक्ती आपल्या स्मारण मधून दूर गेलेला आहे. असा हा महान व्यक्ती यांचे नाव समाजातल्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देणारे आणि देशभक्तीचा आदर्श निर्माण करणारे आहे.
असा हा व्यक्ती म्हणजे इंजिनियर बीके उर्फ बापू कोकरे होय.
बारामती तालुक्यातील हा तरुण म्हणजे एक झंझावात होता, अतिशय राकट आणि भेदक नजर उंची कमी,पण गोटीव शरीर, मनगटा मध्ये दम, आवाजामध्ये करारीपणा,पुढच्या माणसावर प्रभाव टाकण्याची वक्तृत्वशैली आणि लोकांच्या हृदयात घुसणारा शब्दसंग्रह असा व्यक्ती. चेहर्यावर दाढी, अंगात पांढरा शर्ट,जीनची म पँट, सतत इनशर्ट असा पेहराव.जाव या मोटारसायकल वरुन महाराष्ट्र पालथा घातला या माणसाने.
धनगर समाजाच्या उत्कर्षाची जिद्द असणारा हा तरुण म्हणजे सर्व उपेक्षित समाजाला मिळालेला एक महान हिरा होता.
या व्यक्तीची माझी भेट म्हणजे बापू यांची भेट म्हसवड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त झाली.म्हसवड येथे बैरिस्टर टी.के.शेंडगे यांच्या कन्या विद्यालयात झाली.
आमच्या घराशेजारी सुरू केलेल्या या कन्या विद्यालयाच्या कार्यक्रमानिमित्त १९८७ ला बापू कोकरे हे म्हसवडला आले होते.
माझे मित्र शिक्षक जी. डी. मासाळ, व्हि.के. सजगाणे यांनी माझी या महान नेत्याशी ओळख करुन दिली.
म्हसवडच्या कन्या विद्यालयांमध्ये त्यांचं तुफान भाषण झालं या भाषणाला मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. आणि या वेळेला माझी या वादळाशी भेट झाली.
बापू म्हणजे एक वादळ न थांबणारे, बोलण्यामध्येअतिशय भारदस्त पणा होता. नुसती आग ओकणारे वडवानल होय.
एकदा सुरुवात केली की मग विमानाच्या वेगानं पडणारे शब्द पुढच्या माणसाच्या कानातून हृदयाला पार करून जात असतं, आणि हा माणूस गपकन ह्रदयात बसायचा .
तसा मलाही आवडला हा माणूस मी कार्यक्रमानंतर हस्तांदोलन केलं उपस्थित सर्व शिक्षकांनी माझी ओळख करून दिली आणि ही ओळख मैत्रीत लगेच रूपांतर झाली.
यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला बापूराव मला नेहमी बोलवायचे आणि गाडी पण पाठवून द्यायचे.
बी. के. यांनी 1989 साली यशवंत सेना" नावाची एक संघटना स्थापन केलेली. ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या धनगर समाजातील तरुणांना एकत्र केले.
राजे यशवंत राव होळकर या नावाने ही संघटना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचली .
पिवळा ध्वज,जय मल्हार ही घोषणा ,जय अहिल्या ,जय यशवंत, जय मल्हार राव ,अशा आवाजांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.
धनगर समाजाच्या प्रत्येक घराघरावर पिवळा झेंडा फडकू लागलेला. आणि बापूराव कोकरे यांचे काम राना रानात ,शेतात शेतात, घराघरात पोहचले.
जिथे, जिथे संधी मिळेल तिथं "बीके" भाषण ठोकायचे जणू त्यांच्या अंगामध्ये वीज निर्माण व्हायची ,अंगाची लाही.लाही होत.
शब्दाची भेदक कृती आवाजातला प्रेमळपणा आर्जव ता आणि तीक्ष्ण नजर यामुळे उपस्थित तरून अगदी मोहित होत असत.
तरुणाच्या रक्तामध्ये सळसळ निर्माण व्हायची . सळसळणाऱ्या तरुणांना बि.के समाजसेवेचे व्रत द्यायचे .
समाजान एकसंघ व्हावं , शिक्षण घ्यावे, आपल्या समस्यांसाठी राजकारणामध्ये यावं., राजकारणामध्ये सक्षम व्हावं.
आणि समाजातल्या इतर दुर्लक्षित घटकांना बरोबर घेऊन वंचित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तरुणांनी निस्वार्थपणे समाजसेवा करावी.
हे बापूच विचारधन आणि या विचार धनामुळे बापू प्रत्येक तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेले होते.
1989 चा काळ असेल यावेळी बारामती येथील पटांगणावर पहिलं धनगर समाजाचा राज्यव्यापी आंदोलन झाले.
व यशवंत सेनेच्या अधिकृत संघटनेची ची घोषणा करण्यासाठी एक भल्यामोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सुदैवानं या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण आलं मी आणि माझे मित्र पत्रकार प्रकाश कीर्तने,पत्रकार पांडरंगू माळवदे आम्ही तिघे जायचं ठरवलं बीके यांनी आम्हा पत्रकारांना स्वतंत्र जीप पाठवून दिली. होती. आम्ही या कार्यक्रमाला पोहोचलो दिव्य भव्य स्वागत झालं.
हलगी च्या आवाजामध्ये व तुतारी, शिंग यांच्या आवाजात भव्य अशा स्टेजवर आम्हाला उभं करण्यात आलं . आणि जय मल्हार अशी घोषणा करुन आमच्या अंगावर भंडारा उधळला .
आम्ही अगदी कृतकृत्य झालो.
साधारण दोन ते अडीच लाख धनगर बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते जणू आपकी बारामती शहर पिवळ्या रंगामध्ये हे पिवळीजर्द झाले होते. पहाल तिथं भंडारा ने न्हाऊन गेलेले लोक जणू बारामतीची जेजुरी झाली होती.
जेजुरीच्या खंडोबा च्या नावानं चांगभलं अशी घोषणा करत बी.के. नी आपलं प्रचंड आवाजातील भाषण केलं आणि उपस्थित असणाऱ्या धनगर बांधवांना एक आवाहन केलं. प्रत्येकाने समाजासाठी एक रुपयाची नोट माझ्या पदरात टाकावी. असे म्हणताच एक चमत्कार घडला लोकांनी एक रुपयापासून ते शंभर रुपयांपर्यंत नोटा पदरात टाकल्या.
काही क्षणांमध्ये व्यासपीठावर असणाऱ्या गोणी गच्च भरले.
आणि हे माझ्या डोळ्यांनी पाहताना मला खूप आनंद झाला. लोक घरच दिलदार आहेत. धनाचे धनगर आहेत.
समाजासाठी काम करणाऱ्या या नेतृत्वाला सलाम करून आम्ही खाली उतरलो आमची फार मोठी बडेगावी झाली .
आम्हाला भरपेट जेवण घालून निरोप दिला.
जेव्हा या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या तेव्हा प्रस्थापित राजकीय नेत्यांची भंबेरी उडाली होती.
असा हा महान समाज पुत्र जरी आज आपल्यामध्ये नसला तरीही त्यांच्या विचारावर चालणारे तरुण नक्कीच या व्यक्तीचा आदर्श आपल्या मनामध्ये साठवतील.
कोकरे यांना कॉंग्रेसला शरण जाण्यास भाग पाडले गेले. शरण गेल्यानंतर त्याने आपला आत्मा गमावल्यासारखे वाटले आणि 28 जानेवारी 2005. रोजी शारीरिक मृत्यू झाला.
निष्पक्षपणे सेवा करणारा बी.के. यांच्यासारखा समाजसेवक मात्र पुढे निर्माण होणे अशक्यच आहे .
आम्हाला ही या महान व्यक्तीच्या सहवास मिळाल. इतिहास घडविण्यासाठी अशी माणसे जन्माला येतात.
..जय अहिल्या जय मल्हार..
लेकिन -विजय टाकणे,
संपादक माणदेशी न्यूज 9921494998.